R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या अध्यक्षांचं तोंड कापावं लागलं... आचार्य तुषार भोसले यांनी साधला...

व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या अध्यक्षांचं तोंड कापावं लागलं… आचार्य तुषार भोसले यांनी साधला निशाणा

 

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध तापले आहे. तसेच क्रुझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

या सर्व प्रकरणाला वेगळं वळण लागलं किंवा लावलं गेलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा करुन हे प्रकरण आता शाहरुख खान किंवा आर्यन खान राहिलं नसून समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम इथपर्यंत येऊन पोहचलं आहे. वानखेडे यांच्या जातीचा दाखला, मॅरीज सर्टीफिकेट अशी सगळी कागदपत्रे मलिकांनी ट्वीट करत आणि पत्रकार परिषदा घेत जनतेसमोर मांडली आहेत. या सर्व प्रकरणावरुन आता भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत तुषार भोसलेंनी एकाच दगडात २ पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments