R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे, आव्हाडांची थेट धमकी

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे, आव्हाडांची थेट धमकी

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. त्यातच आज समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मलिक यांना चांगलेच खडसेंबोल सुनावले होते. ‘नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला चुकीचा आहे. आमचे खासगी फोटो सर्वांसमोर आणून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या शपथेविरोधी काम करत आहेत. आम्ही लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु अशी सणसणीत चपराक क्रांती रेडकर यांनी लगावली आहे.

तर दुसरीकडे क्रांती रेडकर यांच्या टीकेमुळे भेदरलेल्या मलिक यांच्या मदतीला त्यांचे सहकारी धावून आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे. ‘अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है’ अशी धमकी आव्हाड यांनी दिलीये.

उल्हासनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, समीर वानखेडे यांनी ४ हजार प्रवाशी असलेल्या क्रूझवर धाड टाकली त्यावेळी त्यांना केवळ ६ जण ड्रग्ज घेतलेले मिळाले. बाकी ३ हजार ९९४ जण व्यवस्थित होते. असं कसं हा प्रश्न मला पडला आहे. जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है.’ आव्हाड यांनी थेट एक महिला अभिनेत्रीला धमकी दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments