R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार, ठकरे सरकार उचलणार कारवाईचा बडगा

समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार, ठकरे सरकार उचलणार कारवाईचा बडगा

 

रास्तव्रदुईचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाढ आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच मलिक यांनी लागलेल्या आरोपानंतर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. तर दुसरीकडे आता ठाकरे सरकार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी अधिक वाढवण्याचे काम करताना दिसून येत आहे.

कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची डील झाल्याचं संभाषण ऐकल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. त्या प्रकरणात ठाकरे सरकार आता कडक पावलं उचलताना पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकारने २५ काेटींच्या डीलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडेंवर दुहेरी संकट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने ४ चौकशी अधिकाऱ्यांची नावंही जाहिर केली आहेत.

प्रभाकर साईलसह अन्य तीन जणांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आता राज्य सरकारने या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलं असून सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, पोलिस निरिक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत पारकर, पोलिस उपनिरिक्षक प्रकाश गवळी हे 25 कोटी डील प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments