R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर होणार देशद्रोहाची कारवाई

पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर होणार देशद्रोहाची कारवाई

उत्तरप्रदेश | पाकिस्ताननं भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतान पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यानंतर पाकिस्तान जल्लोष साजरा करण्यात आला होता तसेच भारतातही अनेक ठिकाणी भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, जल्लोष करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली असून त्यांना चांगलंच धडा शिकवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करताना शेजारील देशाला पाठिंबा दिल्याच्या प्रकरणी यूपी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांची रवान्गी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा आरोप असलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांविरोधात आग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गदारोळानंतर आग्रा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाने निलंबित केले होते. काश्मीरमधील तीन विद्यार्थ्यांनी आरबीएस इंजिनिअरिंग टेक्निकल कॅम्पसमध्ये पाकिस्तानच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments