R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'भारतीय राजकारणात भाजप अनेक दशके शक्तिशाली राहील',

‘भारतीय राजकारणात भाजप अनेक दशके शक्तिशाली राहील’,

 

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा भेटीदरम्यान सांगितले की, भाजपा पुढील अनेक दशके भारतीय राजकारणात शक्तिशाली राहील. प्रशांत किशोर मानतात की, भाजपशी अजूनही “अनेक दशके” लढावे लागेल. या वर्षाच्या सुरुवातीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला राज्यात सत्तेत राहण्यास मदत केल्यावर निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर चांगलंच चर्चेत आले होते.

प्रशांत किशोर हे सध्या गोव्यात आहेत आणि टीएमसीला तिथे पाय रोवण्यास मदत करत आहेत. येत्या काही दशकांत भाजपच्या मजबूत उपस्थितीचा अंदाज व्यक्त करत किशोर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. किशोर म्हणाले की, ते (राहुल गांधी) या भ्रमात होते की नरेंद्र मोदींची सत्ता संपुष्टात येणे फक्त थोडा वेळ लागेल.

एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments