R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा दावा, तो मुसलमानच होता

समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा दावा, तो मुसलमानच होता

 

मुंबई | ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे.समीर वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यांनी एका मुस्लिम तरुणीशी विवाहदेखील केला. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी दलित असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर केला, असा खळबळजनक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. आता त्या पाठोपाठ समर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील समोर आले आहेत तसेच त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

समीर वानखेडेंचं कुटुंब आधी मुस्लिम होतं. ते मुस्लिम नसते, तर त्यांचं आणि माझ्या मुलीचं लग्न झालंच नसतं, असा दावा वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांनी केला. समीर वानखेडेंचं कुटुंब पूर्वी मुस्लिम होतं. माझी मुलगी शबाना कुरेशीसोबत त्यांचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार संपन्न झाला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होतं. समीरच्या बहिणीचंही लग्न मुस्लिम कुटुंबात झालं आहे, असं डॉ. जाहीद यांनी सांगितलं.

समीर वानखेडेंचं कुटुंब हिंदू होतं याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं, तेव्हा आम्हाला ही गोष्ट समजली. समीर यांची आई खूप चांगली होती. त्यांच्याशी आमचे खूप चांगले संबंध होते, असं जाहीद म्हणाले. आम्हाला या प्रकरणात अधिक काही बोलायचं नाही. समीर वानखेडे हिंदू असताना त्यांच्याशी मुलीचं लग्न कसं लावलंत अशी विचारणा होत असल्यानं मी आमची बाजू मांडत आहे, असं म्हणत जाहीद कुरेशी यांनी वानखेडेंबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments