R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे - अतुल...

राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे – अतुल भातखळकर

 

कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ लागल्यामुळे पुणे एकदा शाळेची घंटी वाजलेले आहे तर दुसरीकडे राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये ठकरे सरकारने अचानक बदल केल्याने विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच गोंधळून गेले आहेत. सुट्टीच्या दोन वेगवेगळ्या नोटीस समोर आल्याने राज्य सरकारचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला.

आता याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना सुट्टीच्या दोन वेगवेगळ्या नोटीसीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. शाळांना दिवाळीनिमीत्त १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर सुट्ट्या असतील, असं परिपत्रक शालेय शिक्षण विभाग, पुणे यांनी काढलं होतं. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक नवं परिपत्रक ट्विट करत शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर सुट्ट्या असल्याचं जाहीर केलं.

या दोन-दोन सुट्ट्यांच्या वेळापत्रकामुळे पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले. हा मुद्दा लावून धरत भातखळकरांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्याला शिक्षण मंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे, अशी खोचक टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शाळा दीड वर्षांपासून बंद होत्या. विद्यार्थ्यांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षक पालक मोठी मेहनत घेत आहेत. पण सुट्ट्यांच्या या गोंधळामुळे विद्यार्थी पुन्हा गोंधळून गेले आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments