R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश २५ कोटी रुपये प्रभाकर साईलनेच घेतले, गोसावीचा आणखी एक खळबळजनक आरोप

२५ कोटी रुपये प्रभाकर साईलनेच घेतले, गोसावीचा आणखी एक खळबळजनक आरोप

 

सध्या राज्यात नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंहीर आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या गोसावीने एका व्हिडीओच्या माध्यमातून पंच प्रभाकर साईलवर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकरण चांगलेच तापलेले दिसून येणार आहे.

या व्हिडिओमध्ये प्रभाकर साईलनेच २५ कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केपी गोसावीने केला आहे. याअगोदर पंच प्रभाकर साईलने के पी गोसावीवर २५ कोटी डीलचा आरोप केला होता. हे सगळे आरोप केपी गोसावीने फेटाळून लावले आहेत. प्रभाकर साईलला गेल्या ५ दिवसांत कोणत्या ऑफर आलेल्या आहेत. कुणी किती पैसे घेतले प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे CDR रिपोर्ट काढावेत, त्यांचे कॉन्वरसेशन काढावेत, म्हणजे सगळं काही समोर येईल, असं एक व्हिडीओ जारी करत केपी गोसावीने म्हटलं आहे.

तर यार प्रकरणात गोसावी म्हणाला की, ‘त्याने जे काही आरोप केले आहेत, ते सगळे तथ्यहीन आहेत. माझीही फोन कॉल हिस्ट्री तपासा. माझा इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यासंबंधी पैशांचा व्यवहार असायचा. साईल ने आण करायचा. पण २ तारखेनंतर माझी चॅट तपासून बघा, त्याच्याही चॅट तपासून बघा. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे, जर तुम्ही ही केस हातात घेतली आहे तर साईलबद्दलची सगळी माहिती काढा आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याच्यामागे कोण मंत्री आहे, याचीही पोलिस चौकशी झाली पाहिजे असं विधान त्यांनी केले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments