R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल

सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल

 

चेन्नई | दक्षिणेतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना 28ऑक्टोबर रोजी चेन्नईला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती त्याच्या जवळील सूत्रांनी सांगितलं आहे. नियमित तपासासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात त्यांना रात्रभर थांबावं लागणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याशिवाय रुग्णालयानेदेखील याबाबत अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

रजनीकांत यांचे संपूर्ण भारतात चाहते आहेत. त्यांनी अभिनय केलेला चित्रपट हा सुपरहीट ठरतो. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून रजनीकांत अनेक कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. तामिळनाडू राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती.

मागील वर्षी ३१ डिसेंबरला मी नव्या पक्षाची घोषणा करेल असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्याआधी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

दरम्यान रजनीकांत यांना २५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट, समाजकारण, अर्थकारण आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments