R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत

 

समीर वानखेडे हा भाजपाच पोपट असून भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रती टोला लगावला. फडणवीस याप्रकरणी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? यावर बोलताना पोपटाचा धंदा माझा नाही, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. अशातच या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तसेच या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात वाद-विवाद होताना दिसत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात ‘पोपट वॉर’ पाहायला मिळालं. या प्रकरणावरुन नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले.

फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना मलिक म्हणाले की, पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही; असं म्हणत नवाब मलिक यांनी नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. आता या टीकेला भाजप काय प्रतिउत्तर करते हे पावले लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments