R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही नवाब मलिक यांनी लगावला टोला

भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही नवाब मलिक यांनी लगावला टोला

 

मुंबई | सध्या गाजत असलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाशी संबंधित बोगस पंच असलेल्या के.पी. गोसावी आणि भाजपाच्या नेत्याशी पार्टनरशिप आहे. भाजप नेत्यांची नावे विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात उघड करणार असल्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी येथे केले. तसेच ही नावे उघड केल्यानंतर भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असेही त्यांनी बजावले.

मलिक म्हणाले की, भाजपचे अनेक नेते अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात विभागीय संचालक समीर वानखेडे यांना भेटायला जात होते. या नेत्यांचे उजवे हात समजले जाणारे कार्यकर्ते समीर वानखेडे यांना भेटत. कालपासून या हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे नेते आता घाबरले असून आपले प्रकरण बाहेर येवू नये यासाठी धडपड करत असल्याचा आरोपही मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नोएडामध्ये एक बॉलिवूड निर्माण करत आहेत. त्यांना असे वाटते की बॉलिवूडला बदनाम केले की बॉलिवूड बाहेर जाईल. परंतु तसे होणार नाही. बॉलिवूड बनवण्यासाठी दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम आणि काही मराठी कलाकार, दिग्दर्शकांनी ओळख दिली आहे. बॉलिवूड देशाची संस्कृती आणि ओळख संपूर्ण जगात घेऊन जात आहे. बॉलिवूडच्या माध्यमातून राज्यात, मुंबईत लाखो लोकांचा रोजगार चालतो. बॉलिवूडला बदनाम करून योगी महाराज जर ‘युपीवूड’ करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments