R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति प्रभाग परिसीमा बदल आम्ही होऊ देणार नाही, भाजपने दिला सत्तेत असलेल्या शिवसेनेला...

प्रभाग परिसीमा बदल आम्ही होऊ देणार नाही, भाजपने दिला सत्तेत असलेल्या शिवसेनेला इशारा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग परिसीमा बदलाचा मुंबई भाजप तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या संदर्भात मुंबई भाजपा शिष्टमंडळानी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त श्री यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईसह पश्चिम उपनगरातील प्रभाग परिसीमा बदलात सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांना सांगितले, असे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

मंगलजी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनात सादर केलेली परिसीमा बदलाची माहिती आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रभाग परिसीमा बदल यात तफावत आहे. यामुळे केवळ सत्‍ताधारी पक्षांचा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत असल्याची शंका मंगलजी यांनी त्यावेळी व्यक्त केली.

त्यावर बोलताना पुढे ते म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. एका कॅबिनेट मंत्र्याच्या देखरेखीखाली प्रभागाच्या परिसीमेमध्ये अफारातफर केली जात असल्याची टिका मंगलप्रभात लोढा यांनी केली.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त श्री यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली आणि यावर आवश्यक ती कारवार्ई करावी अशी मागणी केली. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागाच्या परिसीमा बदल पारदर्शकतेने व्हावेत अशीही मागणी देखील या शिष्टमंडळाने केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

राष्ट्रविरोधी माहिती प्रसारित करणाऱ्या २० यू ट्यूब वाहिन्यावर मोदी सरकारची कारवाई

नवी दिल्ली | राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने २० यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे...

‘शिवाजी महाराज OBC होते’; महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना बंगळुरु येथे घडली होती. या घटनेमुळे सीमा भागात तसेच संपूर्ण राज्यात चांगलच राजकारण पेटल्याचं चित्र पाहायला...

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच, लवकरच नव्या तारखा जाहीर होणार

मुंबई | म्हाडा पेपर फुटी प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे. म्हाडा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली होती....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments