R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति एसटी कामगाराने केलेल्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा

एसटी कामगाराने केलेल्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा

 

मुंबई |  ऐन दिवाळीच्या तोंडावर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिपील काकडे या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यामळे या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याच मुद्दयावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचं तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी नैराष्याने आत्महत्या करत आहेत. आता तरी सरकारला जाग येणार का? जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल. त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारचं असेल, असं प्रविण दरेकर म्हणाले.

आज नगरमधील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या तसेच यापूर्वी २८ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, अनियमित वेतनाच्या समस्या यामुळे कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झालं आहे. त्या साऱ्याच बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. राज्य सरकारने या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष्य द्यायला हवे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments