R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कमाई वाढल्याने जनतेने थोडीफार महागाईही स्वीकारावी, भाजपा नेत्याचा अजब तर्क

कमाई वाढल्याने जनतेने थोडीफार महागाईही स्वीकारावी, भाजपा नेत्याचा अजब तर्क

 

सतत वादग्रस्त विधाने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करत असल्याचं चित्र अनेकदा दिसून आले आहे. त्यात मगच्या काही दिवसात वाढलेल्या महागाईवरून भाजप मंत्री आणि नेत्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातच मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्याने अजब-गजब भूमिका मांडली. कमाई वाढल्याने जनतेने थोडीफार महागाईही स्वीकारावी. सरकार सर्व काही मोफत देऊ शकत नाही, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.

मध्यप्रदेशचे पंचायत आणि ग्रामविकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांची येथे पत्रकार परिषद झाली. पेट्रोल, डीझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करून राज्य सरकार जनतेला दिलासा का देत नाही, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते उत्तरले, 10 वर्षांपूर्वी दरमहा 6 हजार रूपये पगार असणाऱ्यांना आता 50 हजार रूपये मिळत आहेत. त्यामुळे आताही पेट्रोल, डीझेलचे दर 10 वर्षांपूर्वी इतकेच ठेवण्याची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. समाजातील सर्वच घटकांचे उत्पन्न मागील काही वर्षांत वाढले आहे. आधी कुटूंबात एकच दुचाकी असायची.

आता कुटूंबातील प्रत्येक सदस्याकडे वाहन असते. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील कॉंग्रेस सरकारांच्या काळात देशात महागाई वाढत नव्हती का, असा प्रतिसवालही त्यांनी केला. सरकारला कर आकारणीतून महसूल मिळतो. तो कल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठीच खर्च केला जातो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments