R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर"

“नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर”

 

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात भारतीय जनता पक्षाचा सहभाग असून ता सर्व प्रकणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून मलिक यांच्यावर टीका केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की’ चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते ! असे एका वाक्यात ट्विट करून त्यांनी मलिक यांनी लागलेल्या आरोपावरून त्यांनाच टोला लगावला आहे. आज सकाळी पत्रक परिषेद घेऊन नवाब मलिक यांनी थेट भारतीय जनता पक्षावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केले होते. यावरूनच अमृता फडणवीस यांनी एका वाक्यात टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.

तसेच दरेकर यांनी सुद्धा मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ते म्हणाले की, “मला वाटतं नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, त्या आधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करण्याचा प्रयत्न करायचा अशी त्यांची गेल्या काही दिवसातली कामगिरी दिसतेय. मला असं वाटतं, मंत्री म्हणून शपथ घेताना गुप्ततेच्या ज्या अटी संविधानाने घातलेल्या आहेत, त्याचाही भंग होताना दिसतोय.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments