R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पवारांवर केलेल्या सोमय्या यांच्या टीकेला नवाब मलिक यांचे सडेतोड प्रतिउत्तर

पवारांवर केलेल्या सोमय्या यांच्या टीकेला नवाब मलिक यांचे सडेतोड प्रतिउत्तर

 

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधताना थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दाऊद यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला होता. शरद पवार यांना जाऊन विचारा की १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती. आता या टीकेला आजच्या पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर देताना मलिक यांनी थेट मोदींवर निशाणा साधला होता.

मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात ५ वर्ष सरकार होतं, केंद्रतात त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं. त्या काळात जे आरोप करण्यात आले त्यात काही तथ्य नव्हतं. यावेळी त्यांनी जुन्या प्रकरणाची आठवण करून देताना म्हणाले की, अंधेरीचे काँग्रेस नगरसेवक पुरुषोत्तम सोलंकी हे नगरसेवक होते. त्यांच्यावरही १९९३ बॉम्बस्फोटानंतर गुन्हा दाखल करत टाडा लावण्यात आला. त्यानंतर ते गुजरातच्या भावनगरला स्थलांतरित झाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढे गुजरातमध्ये जाऊन अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. सोलंकी यांचे छोटा शकील, दाऊद यांच्यासोबत संबंध होते. किरीट सोमय्या यांनी माहिती घ्यावी. आमचं सरकार असताना सोलंकी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नंतर मुंबई सोडून ते गुजरातला शिफ्ट झाले होते. भावनगरमधून निवडून आले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये ते १० वर्ष मंत्री होते असा आरोप मलिकांनी केला आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments