R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही, म्हणून मी घरूनच काम करतो'

मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही, म्हणून मी घरूनच काम करतो’

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवरूनच सरकारचा बहुतांश राज्यकारभार पाहिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात जात नाही. ते राज्यकारभार घरातूनच चालवत असल्याचा आरोप विरोधात बसलेल्या भाजपने अनेकदा केला होता. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घरातून काम करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. त्या वृत्तानुसार घरून काम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही. मी घरून होईल तेवढे काम करतो. काम कुठूनही करा घरातून करा किंवा मंत्रालयातून करा, जनतेचं काम होणं, त्यांच्या समस्या सुटणं महत्वाचं असत असं म्हणत विरोधकांना जोरदार तिला लागलेला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात सुरू झालेल्या जुगलबंदीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही जण म्हणताहेत की दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. पण राजकीय बॉम्ब फोडायला दिवाळी लागत नाही. मी तर पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments