R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या विराट कोहलीच्या चिमुकलीवर बलात्काराच्या धमक्या? नेटकर्यांचा संताप

विराट कोहलीच्या चिमुकलीवर बलात्काराच्या धमक्या? नेटकर्यांचा संताप

 

मुंबई | काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या T-20 टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध मॅचमध्ये भारताच्या पराभवानंतर मोहम्मद शमीवर धार्मिक रंग देत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील शमीला पाठिंबा दिला.

मात्र, काही माथेफिरुंनी विराटला लक्ष्य करत अवघ्या १० महिन्याच्या चिमुकली वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हेतर विराट आणि अनुष्काबद्दही चुकीचे भाष्य केले आहे. याच व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉट नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कोणालाही खेळाडूच्या कुटुंबावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा हक्क नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून एका महिला पत्रकाराने ही गोष्ट वाचून अगदी उल्टी करावीशी वाटत आहे असं ट्विट केलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments