R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, अमृता फडणवीस यांनी साधला निशाणा

नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, अमृता फडणवीस यांनी साधला निशाणा

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्रींनावाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लगावत आहेत. त्यातच त्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला होता. नवाब मलिकांनी सोमवारी ट्विट करत अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.

त्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पहायला मिळत होतं. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब आहेत. माझ्या अंगावर आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि असत्याला साथ देणाऱ्यालाही सोडत नाही. ज्या गाण्याचा उल्लेख केला जातोय, ते गाणं मी मोफत बनवलं होतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

देवेंद्रजी आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटीज आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. त्या ग्रुपला मी देवेंद्रजींना घेऊन गेले होते. त्यावेळी जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड देखील नव्हता, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. या गाण्यात बाॅलिवूडचे अनेक कलाकार आहेत. त्यात मी आणि देवेंद्र फडणवीस देखील आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments