R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रत्येक गवतात आणि घरात शिवसेनेचे काम पोहचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची - उदय सामंत

प्रत्येक गवतात आणि घरात शिवसेनेचे काम पोहचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची – उदय सामंत

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. तसेच महानगर आणि मगरपालिकेवर एकहाती भगवा फडकविण्याचे आदेश दिले आहे. त्यातच महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी शिवसैनिकाने आठवडय़ातील फक्त दोन दिवस पक्षासाठी दिल्यास सत्तेसाठी कुणाच्याही कुबडय़ा घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शिवसेनेच्या वतीने कराड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी, शिवसैनिकांच्या शिवसंपर्क मेळाव्यात मंत्री सामंत बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, कराड तालुका संपर्कप्रमुख संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, प्रत्येक गावागावापर्यंत व घराघरापर्यंत शिवसैनिकांच्या माध्यमातून केलेले काम पोहोचवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी पार पाडायची आहे. जिह्यातील शिवसैनिक पेटला तर तो काय करू शकतो, हे जिह्याने पाहिले आहे. त्यामुळे जिह्यात शिवसेनेची घोडदौड आणखी जोरदार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments