R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड आर्यन खान प्रकरणी अभिनेता परेश रावल यांनी मांडले परखड मत !

आर्यन खान प्रकरणी अभिनेता परेश रावल यांनी मांडले परखड मत !

 

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नुकतीच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाला होता २७ दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला असून अद्यापही त्याच्याविषयीच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. २ ऑक्टोबर रोजी आर्यनला कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच अभिनेता परेश रावल यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे.

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता आणि माजी खासदार परेश रावल आर्यन खान प्रकरणी व्यक्त झाले आहेत. “सध्या आर्यन खानसोबत जे घडतंय ते पाहून तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती किंवा चिंता वाटते का? कारण तुम्ही देखील दोन मुले वडील आहात”, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर परेश रावल यांनी मत मांडलं आहे.

“एक वडील म्हणून तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडत असता. पण, तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य कंट्रोल करु शकत नाहीत. मुलं तरुण होत असतात. त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं. तुम्ही दरवेळी त्यांच्या मागे-मागे जाऊ शकत नाही किंवा कुठे जाताय, काय करताय असा जाबही विचारु शकत नाही. त्यांना त्यांचा विचार करायचा असतो. तुम्ही त्यांच्यावर चांगलेच संस्कार करत असता. पण, जर मुलांनी घराबाहेर जाऊन काही चुकीचं कृत्य केलं तर तुम्ही काय करणार? त्यामुळे मला असं वाटतं की, मुलांनी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा असं परेश रावल म्हणाले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments