R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप नेत्यांच्या संपत्ती वैध आहेत का? राऊतांनी उपस्थित केला सवाल

भाजप नेत्यांच्या संपत्ती वैध आहेत का? राऊतांनी उपस्थित केला सवाल

 

मुंबई | तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जवळपास अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरूच होती. अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही मंगळवारी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया मांडत भाजपला धारेवर धरलं. राऊत म्हणाले की, हे राजकारण नाही तर निव्वळ सूडाच्या भावनेनं सध्याच्या घडामोडी घडत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होत. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना २०२४ नंतर आम्हीही यादी करू, आम्हीही तयारी करू असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, लोकशाहीत राजकारणाचा संघर्ष असतोच. पण, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षांमार्फत महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचं सत्र सुरु करण्यात येणं ही बाब चुकीची आहे, याची परतफेड करावीच लागेल असं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments