R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

 

दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५१००९ मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण १,१२७४१ मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना ६३,३८२ मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे.

या विजयानंतर शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसत आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे.

लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments