R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्याकडून खंडणीवसुलीचा प्रयत्न, पाच लाखाची केली मागणी

शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्याकडून खंडणीवसुलीचा प्रयत्न, पाच लाखाची केली मागणी

 

मुंबई | शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. गुजरातमधील एका पोलिस ठाण्याचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हत्येच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने प्रभूंचे नाव घेतले आहे, असे या व्यक्तीने सांगितले. या गुन्ह्यात प्रभू यांना आरोपी न करण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली.

पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली असता असा कुणीच अधिकारी नसल्याचे समोर आले. या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार पोलिस ठाण्यात २८ ऑक्टोबर रोजी गुजरात सीमेवरील संजान पोलिस ठाण्यातून एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव रमेशसिंग चौहान असल्याचे सांगत पोलिस अधिकारी असल्याची बतावणी केली.

पुढे बोलताना त्या अधिकाऱ्याने आम्ही एका आरोपीला पिस्तूलसह अटक केली असून हे शस्त्र घेण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी मदत केल्याचे तो सांगत आहे. तसेच त्याने एक हत्या केली असून तीदेखील प्रभू यांच्या सांगण्यावरून केली आहे. ही माहिती देतानाच रमेशसिंगने प्रभू यांचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता विचारला.

कुरार पोलिसांनी त्यांना मोबाइल क्रमांक आणि घरचा पत्ता मिळवून देतो असे सांगितले. काही वेळाने पुन्हा या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने प्रभू यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी सहकार्य न केल्यास कारवाई करावी लागेल, असे तो सांगू लागला. प्रभू यांनीदेखील कुरार पोलिसांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला. पिस्तूल आणि हत्येच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी हा अधिकारी ५ लाख रुपये मागत असल्याचे त्यांनी सांगितले. कुरार पोलिसांनी या नावाचा कुणी अधिकारी आहे का, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी केली असता असा कुणीच अधिकारी नसल्याचे समोर आले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments