R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांच्या वकीलांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांच्या वकीलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

मुंबई | आयकर विभागाकडून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १ हजार कोटी किंमतीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस काल काढण्यात आल्याचे समोर आलं होत. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच आता आयकर विभागाच्या कारवाई संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण आलं आहे.

अजित पवार संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही.

तसेच आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात आणि कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

एअर इंडिया नंतर मोदी सरकारने दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

  नवी दिल्ली | एअर इंडियानंतर मोदी सरकारने आता सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. अर्थात सीईएल नंदल फायनान्स अँड लीजिंगला २१० कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी दिली आहे....

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धामला देणार भेट

  नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारणातच दर्शन घेण्यसाठी रवाना होणार आहेत. पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात...

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments