R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी मात्र... राणे यांनी साधला आघाडीवर निशाणा

‘वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी मात्र… राणे यांनी साधला आघाडीवर निशाणा

 

मुंबई | सध्या विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांची सोशल मिडियावर टिप्पणी सुरु असते. विविध विषयावरून आणि वक्तव्यांवरून एकमेकां विरोधात टोलेबाजी सुरु असते. वाढती महागाई, इंधन दरवाढ राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून आता पुन्हा भाजपाने मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे एका कार्टूनमधून ही टीका केली आहे.

ट्वीटमध्ये त्यांनी एक कार्टून प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवली आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही दिसत आहे. याला अनुसरुन ‘वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री’ असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेतेमंडळी काही ना काही कारणाने एकमेकांवर सातत्याने निशाणा साधत असतात. आता नितेश राणे यांच्या या ट्वीटमुळे महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments