R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश दिवाळीपूर्वी सदनिका मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी मानले महापौरांचे आभार

दिवाळीपूर्वी सदनिका मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी मानले महापौरांचे आभार

 

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजनेतंर्गत आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते १५८ दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.येन दिवालियाच्या तोंडावर दिव्यांग बांधवांनी या सदनिकाचा विनियोग आपल्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा असे महापौर यांनी बोलून दाखविले होते. तसेच घरे मिळाल्याबद्दल त्यांनी आभार सुद्धा मानले आहेत.

ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त वर्षा दिक्षीत, अश्व‍िनी वाघमळे, महिला बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, प्रविण वीर, धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीष मेहरोल, सचिव शरद पवार आदी उपस्थित होते.

महापालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्या टप्प्यात १८० सदनिकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे 158 जणांना सदनिका देणे प्रलंबित होते. याबाबत आवश्यक ती कार्यवाही दिवाळीपूर्वी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार १५८ दिव्यांग बांधवांना कासारवडवली, पडले, ब्रह्मांड, रिव्हरवूड सागर्ली आदी ठिकाणच्या सदनिकाचे वाटप करण्यात आले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments