R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा!

तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा!

 

महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणीखोरी, वसुली, आणि भ्रष्टाचारा संबंधातील आरोपांच्या सर्व मर्यादा पार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या तोंडाला काळे फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रतीक काळे नावाच्या युवकाने गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केल्याने ठाकरे सरकारच्या सत्तेच्या मस्तीचा आणखी एक नमुना समोर आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याकरिता गडाख यांना मंत्रीपदावरून दूर करावे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री . उपाध्ये बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , प्रदेश सचिव दिव्या ढोले , नगर जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर , ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात प्रतीक काळेच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आल्यापासून नगर जिल्हा हादरला आहे. केवळ २७ वर्षांच्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ ही त्यांची मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून शंकरराव गडाख ह सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, असे उपाध्ये म्हणाले. याआधीही ठाकरे मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या एका मंत्र्यास एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारमधील मंत्र्यांची नावे येणे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणा प्रकार असून सत्तेच्या मस्तीपुढे मंत्र्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याने अत्याचारात सहभागी असलेल्यांना सरकारचा आशीर्वाद असल्याची जनतेची भावना झाली आहे. बलात्कार प्रकरणी पीडितेने आरोप केल्यानंतरही सत्तारूढ पक्षाचा एक पदाधिकारी सरकारी पाठबळाच्या जोरावर उजळ माथ्याने फिरत असताना गडाख यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत असल्याने सरकारच्या नैतिकतेचे वाभाडे निघाले आहेत, असे उपाध्ये म्हणाले.

प्रतीक काळे हा शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक होता. आत्महत्येपूर्वी त्याने तयार केलेल्या ऑडिओ-व्हिडिओ क्लीपमध्ये त्याने शंकरराव गडाख, त्यांची पत्नी, तसेच भावाच्या नावाचाही उल्लेख केला असून गडाख कुटुंबाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली आहे. आपल्याला होणारा त्रास असह्य होत असल्याचे नमूद करून त्याने आत्महत्या केल्याने, गडाख कुटुंबीयांची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, अशी प्रकरणे पाठीशी घालण्याची ठाकरे सरकारची परंपरा पाहता, चौकशी दरम्यान शंकरराव गडाख मंत्रीपदावर राहिल्यास तपासावर दबाव येऊन प्रकरण दडपले जाण्याची शक्यता असल्याने गडाख यांना पदावरून दूर केले नाही, तर जिल्ह्यात उग्र असंतोष उफाळेल व त्याची जबाबदारी ठाकरे सरकारवर राहील असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झाला नाही असा एकही आरोप आता शिल्लक राहिलेला नसून केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळविली आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी स्थानिक माध्यमांनी जोरदार आवाज उठवूनही तो कानावर पडत नसलेले ठाकरे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत किती असंवेदनशील आहे, हेच स्पष्ट झाले आहे, असे उपाध्ये म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments