R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र

आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र

 

मुंबई | क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबी’ने छापेमारी करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. शाहरुखच्या मुलाला अटक केल्याची बातमी देशभरात गाजली. न्यायालयाकडून २ वेळा आर्यनचा जामीन नाकारला गेला. त्यानंतर अखेर दिवाळीच्या आधी आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला.

त्यात याच मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सुद्धा चागंलेच तापले होतं तर आता दुसरीकडे ही माहिती समोर येतेय की, आर्यन खान प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला पत्र पाठवलं होतं. शाहरुखला धीर देत संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. आर्यन खान तुरुंगात असताना हे पत्र राहुल गांधींनी लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील गुरुवारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. २ ऑक्टोबरला एनसीबीने क्रेझवर छापेमारी केली तेव्हा आर्यन खान, अरबाज, मुनमुन यांना पकडलं होतं. सेशन कोर्टाने दोनदा आर्यन खानचा जामीन फेटाळला. तिसऱ्यांदा आर्यनच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नानंतर त्याला जामीन मिळण्यात यश आलं. ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आर्यनच्या समर्थनार्थ उभे राहिले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments