R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश ठेकेदारांना पुन्हा ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी दाखवला ठेंगा

ठेकेदारांना पुन्हा ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी दाखवला ठेंगा

 

ठाणे | एकीकडे कोरोनाच्या संसर्गाने सामान्य आणि व्यवसायिकांचे हाल होत असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेने दिवाळीपूर्वी ठेकेदारांच्या १३०६ बिलांच्या ५३२ कोटी रुपयांपैकी अवघी ३० कोटींचीच बिले अदा केली आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे ठेकेदारांना पुन्हा एकदा ठाणे मनपाने ठेंगा दाखवला आहे तोंडाला पाने पुसली जात असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

मागील महिन्यात ठेकेदारांनी थकलेली बिले मिळावीत यासाठी पालिकेसमोर नऊ दिवस साखळी उपोषण केले होते. त्याच कालावधीत काही मर्जीतील ठेकेदारांची बिले काढण्यात आल्याने ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना नेते, नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेकेदारांची मनधरणी केली.

त्यानुसार दिवाळीपूर्वी ठेकेदारांची २५ टक्के बिले अदा केली जातील असे आश्वासन पालिकेने दिले होते. त्यानुसार मार्च २०२१पर्यंत असलेली बिले पालिकेने काढण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये आता तब्बल १३०६ बिले पुढे आली असून त्यांची देयके ५३२ कोटींच्या घरात असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एवढी रक्कम कशी द्यायची असा पेच पालिकेपुढे होता. त्यावर देखील तोडगा काढून पालिकेने अवघी ३० कोटींचीच बिले देण्याचे निश्चित केले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments