R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृष्णानगर वासीयांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप, जितेंद्र आव्हाड...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृष्णानगर वासीयांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप, जितेंद्र आव्हाड यांनी केले कौतुक

 

ठाणे | दिवाळीचा सण तोंडावर असताना पैशाअभावी सण साजरा करण्यात अडचणी येत आहेत. कोरोना व महागाई यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे आजही समाजातील निराधार आणि गरीब कुटुंबांना दिवाळी सणाचा आनंद घेता येत नाही.त्यांची ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते व युवाशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश अग्रवाल,यांच्या पुढाकाराने कृष्णानगर मधील महिलांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.

सणानिमित्त दिलेल्या दिवाळी फराळ साहित्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनणार आहे.गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महिलांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे,आयोजक उमेश अग्रवाल,रचना वैद्य आदीसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.सुमारे एक हजार महिलांना यावेळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.

महागाई व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब नागरिकांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप केल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी आयोजक उमेश अग्रवाल यांचे कौतुक केले,कृष्णानगर वासीयांचा पाण्याचा व टॅक्सचा प्रश्न देखील सोडवला जाईल असे आश्वासन यावेळी आव्हाड यांनी दिले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments