R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे जिल्ह्यात वाहिले निवडणुकीचे बिगुल, कच्ची प्रभाग रचना तयार करण्यासाठी निवडणूक अयोगाचे...

ठाणे जिल्ह्यात वाहिले निवडणुकीचे बिगुल, कच्ची प्रभाग रचना तयार करण्यासाठी निवडणूक अयोगाचे आदेश

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या अनेक महिन्यापासून लांबलेल्या मंहानगर पालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या कामाला आता सुरवात झालेली असून राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना करण्यासाठी जिल्ह्यातील महापालिकांना कालावधी ठरवून दिला आहे. यानुसार ठाणे आणि उल्हासनगर पालिकेला ३० नोव्हेंबर तर नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेला १८ नोव्हेंबपर्यंत कच्ची प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे.

येणाऱ्या पुडाच्या वर्षी ठाणे महानगर पालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका पार पडणार आहे. जिल्ह्यातील नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली महापालिकांमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असून ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांमधील लोकप्रतिनिधींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पुढील वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यातच राज्य शासनाने नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना नुकतेच एक पत्र पाठविले असून त्यामध्ये कच्ची प्रभाग करण्यासाठी कालावधी ठरवून दिला आहे. तसेच पालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार किती प्रभाग तयार करावेत याबाबतही सूचना केली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांची कच्ची प्रभाग रचना करण्यासंदर्भात आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments