R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करु नये, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करु नये, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला मोठा फटका बसला होता. त्यातच वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत कर्मचारी वर्गाला पगार देण्याइतके पैसे न जमा झाल्यामुळे येन दिवाळी कर्मचाऱ्यांची अंधारात केली होती. त्यात वाढत्या कर्जापाली अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे एकाच खळबळ उडाली होती याचमुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचारी वर्गाने संप पुकारला होता. त्यातच संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. त्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करू नये ही मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात जनतेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचार्‍यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने एसटी कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांत काम ठप्प आहे.

दिवाळीच्या दिवसांत कर्मचार्‍यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करुन कर्मचार्‍यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे. एसटी कर्मचार्‍यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचार्‍यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचार्‍यांच्या मनात निर्माण झालेला अविश्‍वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचार्‍यांत असंतोषाचा भडका उडाला आहे.
एसटी कर्मचारी-कामगार जगला तरच एसटी जगेल हे भान बाळगण्याची माझी आपणाला विनंती आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई करु नये, अन्यथा कर्मचार्‍यांत असंतोषाचा उद्रेक होईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments