R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोठी बातमी | ठाण्याचा ग्रामीण भाग करोनामुक्तीच्या दिशेने

मोठी बातमी | ठाण्याचा ग्रामीण भाग करोनामुक्तीच्या दिशेने

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणांमाफर्त राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील ४०४ गावे करोनामुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यातील ४३१ पैकी ४०४ गावांत मागील २८ दिवसांत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच डोंबिवलीलगत असलेली २७ गावे करोनामुक्त झालेली नाहीत. ही गावे करोना मुक्त झाल्यास ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग १०० टक्के करोनामुक्त होणार आहे.

ठाणे ग्रामीण भागातील करोना रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. चाचणी, उपचार, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि जनजागृती या बाबींवर ग्रामीण भागांत विशेष भर देण्यात येत असून या पंचसूत्री कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. ४३१ गावांपैकी ४०४ गावांत मागील २८ दिवसांत एकही करोना रुग्ण आढळून आलेले नाहीत.

त्याचप्रमाणे २७ गावांचा काही परिसर तसेच अंबरनाथ तालुक्यातील दोन, भिवंडीतील चार, कल्याण १२, मुरबाड पाच आणि शहापूरमधील चार गावे करोनामुक्त झालेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही गावे लवकरात लवकर करोनामुक्त व्हावेत याकडे जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील करोनामुक्त गावात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक गावागावांत शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत नागरिकांमध्ये करोना नियमांचे पालन करण्याविषयीचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांची ताप तपासणी आणि प्राणवायू तपासणी करण्यात येते.

आतापर्यंत ठाणे ग्रामीण भागात २,९३८ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण भागात १७० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये अंबरनाथ २४, कल्याण ११३, भिवंडी १८, शहापूर १२ आणि मुरबाडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. १६० गावांत एकही मृत्यू नाही ठाणे ग्रामीण भागात एकूण १६० गावांत अद्याप एकही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील नऊ, भिवंडी २५, कल्याण १२, मुरबाड ७५ आणि शहापूरमधील ३९ गावांचा समावेश आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments