R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'शिवसेनेनं आजवर रामदास कदम यांना खूप काही दिलं, रामदास कदम यांचे सूचक...

‘शिवसेनेनं आजवर रामदास कदम यांना खूप काही दिलं, रामदास कदम यांचे सूचक विधान

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून एका कथित ऑडियो क्लिपमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपासून झालेल्या दसरा मेळाव्यातही रामदास कदम आले नव्हते, त्यामुळे नाराजीच्या चर्चा वाढल्या. यानंतर रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण, आता या सर्व नाराजी नाट्यावर रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल सूचक वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले, वयाच्या १८व्या वर्षापासून रामदास कदम यांनी एकनिष्ठेने पक्षाची कामे केली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. राहिला प्रश्न त्या ऑडिओ क्लिपचा, तर रामदास कदम यांनी स्वतः त्या ऑडिओ क्लिपबाबत खुलासा केला आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी संपलाय, त्यामुळे पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरेंचे आमच्यावर प्रेम आहे आणि आदित्य ठाकरे यांचे आमच्याशी वेगळे नाते आहे. आमच्या संबधामध्ये विरोधकांनी कटुता आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात कधीच यश येणार नाही, असं योगेश कदम म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments