R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात,

पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात,

 

बारामती | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मीडियाशी बोलताना पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदाही साजरा झाला. या कार्यक्रमाला अजित पवार यांचा अपवाद वगळता संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते ​मंत्री धनंजय मुंडेंनीही आज सकाळी लवकरच पवारांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, असं सांगितलं.
​’

पवारांसाहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थनाही केली, असं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी, ‘बहिणीकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा आल्या का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत. तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा’, असं म्हणत त्यांनी पत्रकारांची फिरकीही घेतली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments