R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट राजकीय चर्चांना दहन

आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट राजकीय चर्चांना दहन

 

मुंबई | एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात युतीच्या चर्चा होत असताना दुसरीकडे आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या तर्कवितर्कांनंतर आशिष शेलार यांना राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारणा केली असता त्यांनी या भेटीचा उद्देश सांगितला. तसेच भेटीत राज ठाकरे यांना पुस्तकही भेट दिल्याचं सांगितलं.

आशिष शेलार म्हणाले, “मी पेंग्विन प्रकाशनाचं ‘बूक ऑन मुव्ही’ हे छानसं पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिलं. त्यात जगभरातील १०० प्रसिद्ध चित्रपटांविषयी माहिती आहे. मी स्वतः हे पुस्तक पाहिलं होतं आणि आवडलं होतं. त्यामुळे या दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्याशी भेटायचं ठरलं तेव्हा मी हे पुस्तक भेट दिलं. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचीच होती. या भेटीत या पलिकडे काहीही नाही. “

आशिष शेलार यांनी ही भेट केवळ दिवाळी शुभेच्छांसाठी असल्याचं म्हटलं असलं तरी राजकीय नेत्यांच्या प्रत्येक भेटीत भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा होत असल्याचं बोललं जातं आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून मनसेने आपला अजेंडा मराठी माणसापासून हिंदुत्वाकडे नेलाय. याचाच भाग म्हणून मनसेच्या पक्ष झेंड्यातही बदल करण्यात आला. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणातील भाषाही काहीशी बदललेली पाहायला मिळत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments