R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एकनाथ शिंदेची पोलिसांसोबत दिवाळी, लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

एकनाथ शिंदेची पोलिसांसोबत दिवाळी, लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

 

ठाणे | नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत फराळाचा अस्वाद घेतला. या कार्यक्रमाला ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्यासोबतच इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. फराळाच्या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते, विशेष: महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होती. अशाही परिस्थितीमध्ये पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले, अनेक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला. मात्र तरी देखील ते आपल्या कर्तव्यापासून मागे न हातात आपले कर्तव्य निभावले होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, इतरही वेळेस पोलीस आपले काम करत असतात, सण उत्सव, निवडणुकींच्या काळात त्यांना १२-१२ तास काम करावे लागते. त्याचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर येतो मात्र तरी देखील ते कधीही तक्रार करत नाहीत. पोलीस हे जणतेचे रक्षक असतात, पोलिसांमुळे आपण सुरक्षीत आहोत. कोरोनाकाळात पोलिसांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करावे वाटते. परिस्थिती धोकादायक बनली होती, तरीही ते आपले कर्तव्य बजावत होते.

आज कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आला होता, जनतेला घराबाहेर पडण्यास मनाई होती. मात्र तरी देखील काही जण बाहेर पडतच होते, अशा लोकांवर कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले देखील झाल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, मुख्यमंत्री त्या दृष्ट्रीने पाऊले उचलत असल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments