R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश ठाण्यात दगड-मातीविना साकारला मुरुड जंजिरा पुठ्ठा व फोमचा वापर करून किल्याची प्रतिकृती

ठाण्यात दगड-मातीविना साकारला मुरुड जंजिरा पुठ्ठा व फोमचा वापर करून किल्याची प्रतिकृती

 

ठाणे,दि : ठाणे पूर्वेकडील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने दिवाळीत किल्ले बनवण्याची २५ वर्षाची परंपरा यंदाही जपली आहे.शहरांमध्ये कॉंक्रीटचे जंगल फोफावु लागल्याने दगड – माती दुर्मिळ बनली आहे.या पार्श्वभुमीवर पवनसुतच्या शिलेदारांनी यंदा दगड-मातीचा वापर न करता पुठ्ठा व फोमचा वापर करून हुबेहुब मुरुड जंजिरा या जलदुर्गाची प्रतिकृती साकारली आहे.समुद्राच्या पाण्याने घेरलेल्या या जलदुर्गाला पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह आबालवृद्धांची रिघ लागली आहे.

अरबी समुद्राने घेरलेला रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा अभेद्य असा जलदुर्ग आहे. ठाणे पूर्व कोपरीतील साईनाथनगर येथील हनुमान मंदिराजवळ पवनसुत सेवा प्रतिष्ठानने मुरुड जंजिरा किल्याची सुबक प्रतिकृती साकारली आहे.ठाण्यात नागरीकरण वाढु लागल्याने जागोजागी सिमेंट-कॉक्रीटच्या बांधकामांचे प्राबल्य वाढले. त्यामुळे किल्ले साकारणाऱ्या बच्चे कंपनीला किल्ले बनवण्यासाठी दगड,माती उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्याने पवनसुतच्या मावळ्यांनी यंदा पुठ्ठा आणि फोमसह कागदाच्या लगद्याचा वापर करून मुरुड जंजिरा हा जलदुर्ग साकारला आहे.किल्याची हुबेहुब प्रतिकृती आणि सभोवती अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीचे विहंगम दृष्य अगदी अप्रतिम साकारले आहे.

दीपावलीच्या सणात एकीकडे फटाके,फराळ आणि डोळे दिपवणारी रोषणाई सगळीकडेच पाहायला मिळते.मात्र,या साऱ्या खर्चिक उपक्रमांना बगल देत ठाणे पूर्वेकडील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानचे शिलेदार आगळ्यावेगळ्या प्रकारे प्रदुषणविरहीत दिवाळी साजरी करतात.गेली २५ वर्ष मंडळाचा हा उपक्रम सुरु असुन दरवर्षी एका किल्याची प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जागवत एकप्रकारे सामाजिकतेचा वसा जपला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments