R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धारावीत शून धाडीत रुग्ण मात्र दादरमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ

धारावीत शून धाडीत रुग्ण मात्र दादरमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ

 

मुंबई | धारावी पॅटर्नमुळे दाट झोपडपट्टीतही अनेकवेळा शून्य बाधित रुग्णांचा विक्रम अध्यपही कायम असलेला दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे सतत गजबजलेले दादर परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. दिवाळीत नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढत असताना धारावी मध्ये बाधित रुग्णांची संख्या सलग दोन दिवस शून्य आहे. दादर परिसरात मात्र शनिवारी नऊ बाधित आढळून आले आहेत.

मध्यवर्ती ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरात कायम लोकांची गर्दी असते. तर धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार असे सूत्र अवलंबल्याने जुलै २०२० मध्ये धारावीत कोरोना नियंत्रणात आला. दिवाळीनिमित्त दादर भागात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. परिणामी, बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ दिसून येत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागाने कोरोनाचा प्रसार कशा प्रकारे रोखता येईल? याचा आदर्श जगापुढे ठेवला तसेच जागतिक आरोग्य संघटनेने याची चर्चा सुद्धा केली होती. या पॅटर्न धारावी पॅटर्नमुळे आतापर्यंत ३० हून अधिक वेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र दुसरीकडे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सदैव गजबजलेले दादर विभागानेही अनेक उपाययोजनानंतर कोरोनावर मात केली होती. मात्र सध्या या विभागात ८१ सक्रीय रुग्ण आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments