R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा", आता संदीप देशपांडे कोणता खुलासा करणार !

“वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा”, आता संदीप देशपांडे कोणता खुलासा करणार !

 

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडी तसेच मुंबई मनपा मधील अनेक घोटाळे उघड केले होते. त्यापाठोपाठ भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या कामकाजावरून मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने वाद होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा”, असे म्हणत हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप देशपांडे मुंबईतील मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. “भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा, पदधिकाऱ्यांची बैठक, नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. शिवसेना व भाजपानेही मुंबई महापालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. तर, शिवसेनेनेही भाजपाला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आता माणसे काय खुलासा करणार हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments