R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा रोज "एकपात्री कार्यक्रम"

पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा रोज “एकपात्री कार्यक्रम”

 

धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून “गेम” वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही मागणी करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी “गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या पत्रकार परिषदा म्हणजे, ड्रग्ज आणि पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी सुरु असलेला एकपात्री प्रयोग असल्याचा” आरोप आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

सकाळी भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा धाग पुढे पकडून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात बेदिली माजली आहे. दाऊदचा हस्तक आणि ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत असा रिंकू पठाण याला लाँकडाऊ काळात सोडण्यात आले. तसेच जेव्हा राज्यात पहिला कडकडीत लाँकडाऊ सुरु होते तेव्हा हा रिंकू पठाण सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी भेटला. राज्यात फेसबुक आणि सोशल मिडियावर कोणी लिहीले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दाऊदचा हस्तक गृहमंत्र्यांना सह्याद्रीवर भेटतो? सह्याद्रीच्या आता वसुली अड्डा झालाय का? असा सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला .

रिंकू पठाण भेटल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी हळूहळू धागेदोरे जमा करून ड्रग्ज माफियांना अटक करायला सुरुवात केली. सुमारे 20 ड्रग्ज वितरकांना अटक करण्यात आली. ही माहिती एनसीबीने ही माहिती एन आय ए आणि ईडीला दिली. म्हणून एनसीबीवर उट्ट काडण्यात येते आहे. आरोपी रिंकू पठाण आणि करिम लाला यांच्या माणसांना अटक का करता म्हणून एनसीबीवर उट्ट काढण्यात येते आहे. एनसीबीच्या विरोधात कटक कारस्थान रचले जात आहे. राज्यात अशा प्रकारे बेदीली माजली आहे. आर्यन खानच्या प्रकरणात एकपात्री प्रयोग गेले महिनाभर सुरु आहे तो घातक आहे हे आज स्पष्ट झाले. हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा आणि तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलणारा आहे.

आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे? सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही? त्चाचा राष्ट्रवादीशी संबंध काय ? अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना आम्ही संधी देतो. खरे सांगा नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला.

हा सुनील पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील आबा यांची बदनामी करतो आणि राष्ट्रवादीला त्यांचे काही वाटत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळपायाची आग मस्तकाला का जात नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच धक्कादायक म्हणजे हा सुनील पाटील आपल्या संभाषणात आत्ताचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांची बदनामी करतोय. ज्या गृहमंत्री वळसे-पाटील यांचा महाराष्ट्र आदर करतो त्यांच्या विषयी हा सुनील पाटील बोलतो? मद्यपींच्या बैठका? काय चाललय हे? कसल्या बैठका? कोण हा माणूस? या सुनील पाटलांचा धंदा काय? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

या सुनील पाटीलचा धंदा हा मंत्रालयातील बदल्यांच्या दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे, परागंदा आहे की राष्ट्रवादीने त्याला लपवले आहे. आमचा राष्ट्रवादीवर आरोप आहे की, पोलीस बदलत्यांमधील मुख्य दलाल हा गयब, परागंदा नसुन त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे का? संरक्षण दिले आहे का? इंडियन पोलीस सर्वीसचा खाक्या मोडकळीस आणण्याचा हा सुनील पाटील प्रयत्न करीत असल्याने त्यावर गुन्हा दाख करुन तपास सीबीआयकडे तपास द्यावा.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments