R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या किरीट सोमय्यांची नजर आता आणखी 3 मंत्र्यावर...!

किरीट सोमय्यांची नजर आता आणखी 3 मंत्र्यावर…!

किरीट सोमय्यांनी कालच ट्विट करून पुढील काही आठवड्यात ठाकरे सरकारमधील 3 मंत्र्याचे घोटाळे उघडकीस आणणार असून त्यातील पहिला खुलासा लवकरच करणार आहे. त्यानंतर लगेचच आज किरीट सोमय्यांनी ट्विट करून खळबळजनक दावा केला आहे.

किरीट सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, इन्कम टॅक्स विभागाला सापडलं… बुलढाण पतसंस्थाचे 1200 बेनामी अकाउंट 54 कोटी रुपये!! कुठल्या मंत्र्याची बेनामी संंपत्ती !! ठाकरे सरकार जवाब दो’ असे अनेक खुलासे किरीट सोमय्या यांनी ट्विटमधून केले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर मात्र सोमय्या नेमकं कोणावर निशाणा साधत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवाय याआधी किरीट सोमय्या यांनी सांगितले इन्कम टॅक्स विभागाने बुलढाणा पतसंस्थेमधील 53.72 कोटींच्या बेनामी व्यवहाराबद्दल कारवाई केल्याचा दावा केला होता. शिवाय मी या प्रकरणातील ठाकरे सरकारच्या मंत्र्याचा हात आहे का? हे तपासण्यासाठी लवकरच बुलढाणा आणि नंतर नांदेडला जाणार असल्याचही त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी कालच ठाकरे सरकारमधील 3 मंत्र्याचे घोटाळे लवकरच उघडकीस आणणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच सोमय्यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर आता किरीट सोमय्या नेमकं ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्याबदद्ल बोलत आहेत? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments