R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ द आफ्रिका Vs इंग्लंड | रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेचा चौथा विजय,

द आफ्रिका Vs इंग्लंड | रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेचा चौथा विजय,

 

टी-20 विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात कगिसो रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा १० धावांनी पराभव केला. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिका संघाचा चौथा विजय होता. तरिही दक्षिण आफ्रिका संघाच्या पदरी निराशाच पडली आहे. कारण, नेटरनरेट कमी असल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं नाही. अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अ गटांमध्ये ऑस्ट्रलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी आठ गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. गोलंदाजांनीही आपलं काम व्यवस्थित पार पाडलं. मात्र, संघाला मोठा विजय मिळवून देण्यात अपयश आलं. संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात अपयश आलं. अखेरच्या षटकांत कगिसो रबाडानं सलग तीन चेंडूवर तीन विकेट घेत हॅटट्रीक केली. विश्वचषकातील ही तिसरी हॅटट्रीक होय.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघानं १८९ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडला विजयासाठी १९० धावांचं लक्ष दिलं होतं. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडला १३१ धावांच्या आतमध्ये थांबवायचं. पण आफ्रिकेच्या गोलंदाजांना यात अपयश आलं. इंग्लंड संघानं निर्धारित २० षटकांत १७० धावांपर्यंत मजल मारली. हा सामना दक्षिण आफ्रिका संघानं १० विकेटनं जिंकला.

मात्र, उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं. अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्या फेरीत पोहचले आहेत. ब गटांमधून पाकिस्तानच्या संघाचं तिकिट पक्कं झालं आहे. दुसऱ्या संघाचा निर्णय आज होणार आहे. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहचणी संधी आहे. आज, दुपारी होणाऱ्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर ब गटातील दुसऱ्या संघाच नाव समोर येईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

  टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय...

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

  मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments