R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला

 

नाशिक | नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असताना आता दुसरीकडे अशोक नगर परिसरात एका तरुणाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांवर चॉपरने जीवघेणा हल्ला केला आहे. सदर हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले आहे. चॉपरने हल्ला केल्याची घटना घडताच परिसरात खळबळ उडाली आहे. आसपासच्या लोकांनी तातडीने तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. श्याम फर्नांडिस असं हल्ला झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर सागर जाधव आणि राजू उगले असं दोघां जखमी तरुणांची नावं आहेत. संबंधित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करत संशयित आरोपी संतोष ढमाळ याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. एकच घाव अन् खेळ खल्लास; नालासोपाऱ्यात भाऊबीजेदिवशीच वृद्ध महिलेची निर्घृण हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिवसेना पदाधिकारी श्याम फर्नांडिस आणि त्यांचे दोन साथीदार सागर जाधव आणि राजू उगले हे तिघे दोन भावांमधील भांडणं सोडवण्यासाठी अशोक नगर येथील जाधव संकुलात गेले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments