R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सखोल चौकशीचे आदेश

नगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सखोल चौकशीचे आदेश

 

नगर जिल्हा रुग्णालयात आज सकाळी आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ जणांवर उपचार सुरु आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्राथमिक चौकशी आणि माहितीनुसार प्रथम रुग्णालयातील एसीला आग लागली, ती आटोक्यात आणण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे काही रुग्णांचा गुदमरुन तर काहींचा दुसरीकडे स्थलांतरीत करत असताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी एसीमध्ये लागलेल्या आगीमुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग जळून खाक झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी खास कोरोना कक्ष तयार करण्यात आला होता. रुग्ण वाढू लागल्याने त्याचे अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आले.नाशिक गॅस दुर्घटनेनंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागात १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, या विभागातील एसीला आग लागली. ती लक्षात आल्यावर हालचाली सुरु झाल्या. परंतु ऑक्सिजन बंद केल्याने आणि तोपर्यंत धूर आणि आग पसरल्याने एकच गोंधळ उडाला.रुग्णांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली. हे सुरु असताना आग भडकली आणि आत प्रवेश करणे अवघड झाले, अशी घटनेबाबत प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आणि मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments