R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद सह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच न्यायालयाने लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षाही रद्द केली आहे. या प्रकरणी पोलीस कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत, असे सांगितले जात आहे. तर, यंदाच्या एप्रिलमध्ये लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदसह सहा जणांना प्रत्येकी नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

हाफिज सईद हा जमात-उद-दावा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करतो. जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून, या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते. यापूर्वी हाफिज सईदसह या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या सीटीडी विभागाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. यामध्ये प्रा. मलिक जफर इक्बाल, याह्या मुजाहिद (जमात-उद-दावाचा प्रवक्ता), नसरुल्लाह, समिउल्लाह, उमर बहादूर यांचा समावेश होता. तर, हाफिज सईदचा मेहुणा हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हे सर्वजण निधी गोळा करत होते आणि प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तोयबाला बेकायदेशीरपणे वित्तपुरवठा करत होते. दहशतवादाच्या आर्थिक मदतीतून जमा झालेल्या निधीतून बनवलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments