R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले ५३ कोटी कुणाचे?

बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले ५३ कोटी कुणाचे?

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील अनेक मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप लगावले आहेत. बुलढाणा सहकारी पतसंस्थेत एकूण ५३.७२ कोटी रुपये सापडले आहेत. हे पैसे नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे पैसे नक्की कुणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्यांचही सोमय्या यांनी स्पष्ट केलं.

सप्टेंबर महिन्यात बुलढाणा येथील बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते. आता पर्यंत १२०० हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत आहे, या खात्यांद्वारा ५३.७२ कोटी मनी लॉंडरींग करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आयकर विभागाने हे ५३.७२ कोटी रुपये असलेली १२०० बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी हे पैसे ठाकरे सरकारच्या एका मंत्र्याचे असल्याचे कळते असा दावा केला आहे. बुलढाणा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांना या व्यवहारांची पूर्ण जाणीव आहे. बुलढाणा नागरी पतसंस्था द्वारा कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार होत आहेत, याची माहिती गेले अनेक महिने कानी आली होती. ठाकरे सरकारचे राजकीय नेते मंत्री आणि या पतसंस्था/ बँकेचे अध्यक्ष द्वारे अश्या प्रकाराचे शेकडो बेनामी बँक खाते उघडणे, त्यात रोख रक्कम जमा करणे, व त्या समोर कोट्यवधींचे रुपयांचे कर्ज देण्याचे व्यवहार ही पुढे येत आहेत, असं सोमय्या म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments