R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा कीटक नाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा कीटक नाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

 

बीड | आपल्या विविध मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्रातील २५० बस डेपोंपैकी १०० पेक्षा अधिक बस डेपो बंद आहेत. तर अनेक डेपोत कर्मचाऱ्यांनी काम बंद अनोंदलं पुकारले आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांमधूनही यावर आक्रमक पाऊलं उचलली जात आहेत.

बीड आगारातील संतप्त एसटी चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बीड आगारातील एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे. बीड येथे संपकरी चालकाने शेतीवर फवारणारे औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय. सध्या या चालकावर जिल्हा रुग्णालयात दाखल सुरू आहेत. अशोक कोकटवार असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. तर काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानं राज्यभर वातावरण चिघळले आहे. त्यातच बीड येथे संपकरी अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments