R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड बिग बॉसच्या घरातून तृप्ती देसाईंची एक्झिट, 'बिग बॉसचे घर सोडताना अश्रू झाले...

बिग बॉसच्या घरातून तृप्ती देसाईंची एक्झिट, ‘बिग बॉसचे घर सोडताना अश्रू झाले अनावर

 

मुंबई ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत असून काल बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून एका मोठ्या सदस्याचे एलिमेशन झाले. बिग बॉस मराठीच्या घरातून काल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या बाहेर पडल्या. यावेळी तृप्ती देसाई भावूक झाल्या. विशेष म्हणजे तृप्ती देसाईंना निरोप देतेवेळी घरातील इतर मंडळीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मागच्या आठवड्यात रंगलेल्या एका टास्कदरम्यान ज्यांना ‘नॉमिनेट’ करायचे आहे अशा खेळाडूंचे फोटो व्हाईट बोर्डवर आणि इतरांचे फोटो तोरणावरील पानांवर लावण्याचे आदेश बिग बॉसने दिले होते. यावेळी कॅप्टनने चार खेळाडूंना नॉमिनेट करावं, असा आदेश बिग बॉसने दिला होता.

या आदेशानंतर प्रत्येक खेळाडूला ‘नॉमिनेट’ झालेल्या चौघांपैकी फक्त दोघांचे फोटो तोरणावरील फोटोंसोबत ‘एक्सचेंज’ (अदलाबदली) करण्याची परवानगी देण्यात आली होती. या टास्कमध्ये सर्वात शेवटी आलेल्या उत्कर्षने सोनाली घराबाहेर जावी या हेतूने फोटोंची अदलाबदली केली. यामुळे व्हाइट बोर्डवर मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई या खेळाडूंचे फोटो शिल्लक राहिले.

तर विशाल निकमला उत्कर्षने आधीच टेम्पटेशन टास्कमध्ये नॉमिनेट केले होते. यामुळे विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच खेळाडू ‘नॉमिनेट’ झाले होते. या पाच सदस्यांमधून तृप्ती देसाई या घराबाहेर पडल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments